सुभाष साळुंके
  • Home
  • Aboutus
    Aboutus Gallery Work
  • Contactus
Responsive image

सुभाष साळुंके

महाविद्यालयीन काळापासून समाजसेवा व राजकारण या दोन्ही गोष्टी मनात बिंबल्या होत्या . डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालया मध्ये बी. एस. सी करतानाच सी आर व जे एस च्या निवडणूका अत्यंत जोकस पणे भारतीय विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून लढलो आणि जिंकलो. मिलिटरी बॉईज हॉस्टेल मध्ये राहून महाविद्यालयीन शिक्षण ( बी. एस. सी ) पूर्ण केले. पुढील शिक्षण आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने इच्छा असूनहि शिकता आले नाही . वडील बंधूच्या सहकार्याने शिक्षण व नोकरी या दोन्ही गोष्टी घडल्या.
         परंतु अंबरनाथ मध्ये आल्यानंतर पूर्व श्रमांचा अनुभव व शिवसेनेच्या ओढीतून अनेक शिबिरे व कार्यक्रम राबवण्यात पुढाकार घेतला, घरची परिस्तिथी बेताची म्हणजे आई वडील शेतकरी परंतु गावच्या विकासामध्ये व घडणी मध्ये पुढाकार घेण्याचा वसा तसेच लोकांना मदत करणे विविध शासकीय योजना गावामध्ये आणणे , रस्ते पाणी इ. सुविधा निर्माण करणे, याबाबत माझे वडील व मोठे भाऊ यांचा वारसा जपण्याचे व राखण्याचे काम शिवसेनेचा माध्यमातून चालू केले , या तुन संगटनेचे विभाग प्रमुख पद असो किंवा स्वीकृत नगरसेवक या माध्यमातून शिवसेना संघटना घराघरात व विभागात काम प्रत्यक्ष कार्यक्रम व उपक्रमांच्या मध्यंमांतून अप्रत्यक्षरित्या पोहचविण्याचे काम आम्ही केले...
        गेली २५ ते २६ वर्षे सातत्याने विविध शैक्षणिक उपक्रम ,आर्योग्या शिबिरे ,महिला सक्षमीकरण करण्याकरिता प्रशिक्षणे कार्यक्रम ,रोजगार मेळावे ,करियर मार्गदर्शन शिबिरे राबवण्याचे काम करीत आहोत .
        यातच सण २०१५ च्या अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीत नागरिकांच्या प्रचंड प्रतिसाद आणि सहकार्याने प्रभाग क्र ४४(वडवली,कृष्णानगर )मधून नगर सेवक म्हणून निवडून आल्या नंतर मतदारांना अपेक्षित असल्येल्या प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्यास यशस्वी झालो.
        गोर - गरीब, गरजू व वंचित , निराधार तसेच सुशिक्षित लोकांपर्यंत शासनाच्या विविध योजना थेट पोहचविण्या तसेच योजनांचा प्रत्यक्ष लाभ देण्याच्या दृष्टीने सातत्याने शिबिरे व कार्यक्रम आयोजित केले.
        यामध्ये जनधन योजना बँक खाते (झिरो बॅलन्स), प्रधान मंत्री आयुष्यमान भारत योजना, निराधार पेन्शन योजना ,श्रमयोगी मानधन योजना ,नोकरी कार्ड व आरोयग्य कार्ड नोंदणी शिबिरे इत्यादी योजनांचा प्रत्यक्ष पणे लाभार्थीना देण्याचा प्रयत्न माझ्या संवाद जनसंपर्क कार्यालयातून केला.

#

आरक्षण १२१, MPSC, UPSC

#

सुशोभीकरण

#

गार्डन

#

मैदान

#

रस्ते

#

स्वच्छता अभियान

#

महानगर गॅस

#

सोई सुविधा

#

विदयुत पोल

#

पाणी

#

ड्रेनेज

#

प्रस्तावित व्यायामशाळा

#

दिवाबत्ती

#

शौचालय

#

कचराकुंडी मुक्त विभाग

#

इमारत भवन

#

कमान नामकरण

#

राबवलेले कार्यक्रम

#

शासकीय योजनांचा लाभ (थेट नागरिकांपरीयंत )

#

सामाजिक उपक्रम

#

महिला सक्षमीकरण कार्यक्रमांचे आयोजन

#

श्रावण उत्सव आयोजन

#

सामाजिक भान आणि कर्तव्य

#

स्पर्धा आयोजन



संपर्क
  • कार्यालय : 04,गोविंद दर्शन , रायगड बिल्डिंग समोर, वडवली विभाग, अंबरनाथ (पूर्व)


  • Email :subhash.salunke72@gmail.com


© 2019 Copyright: edzootech